Disha Patani : दिशाचे बिकिनीतील फोटो व्हायरल

Disha Patani : दिशाचे बिकिनीतील फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दिशा पटानीने मालदीवच्या बीचवर बिकिनी फोटोशूट केलं आहे. तसं पाहिलं तर दिशाला समुद्र खूप आवडतो. ती नेहमी समुद्र किनारी फोटोशूट करते. तिच्या इन्स्टाग्रामवर पाहिलं तर तिचे असंख्य फोटो हे बीचवरील आहेत. (Disha Patani ) समुद्र किनाऱ्यावरील फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. आता दिशाने आपल्या मालदीव प्रवासातील एक जुना फोटो (थ्रोबॅक पिक्स) शेअर केला आहे. यामध्ये ती स्ट्रेपलेस व्हाईट ब्रामध्ये एक बोल्ड अंदाजात पोज देताना दिसत आहे.  (Disha Patani )

जेव्हा व्हेकेशनवर जायचं असतं तेव्हा दिशाचे फेव्हरेट डेस्टिनेशन मालदीव वा दुसरी बीच असतो. दिशाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर जो फोटो शेअर केला आहे, त्यात ती पांढऱ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये दिसते. तिने फोटोसाठी सुपर्ब पोज देऊन आपली बिकिनी बॉडी फ्लॉन्ट केली.

साऊथ स्टार सूर्यासोबत झळकणार

आगामी पीरियोडिक ॲक्शन चित्रपट 'सूर्या ४२' मध्ये दिशा दिसणार आहे. दिशा म्हणाली, "मी सूर्या सर आणि शिवा सर यांच्यासोबत आमच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यासाठी खूप उत्साहित आहे.

सूर्या ४२ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून ते ३ डी मध्ये असेल. दिशा पुढे म्हणाली, या चित्रपटात जी भूमिका मी साकारत आहे, ती अनोखी भूमिका आहे. प्रेक्षकांसमोर माझी ही भूमिका आणण्यासाठी खूप उत्साहित आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news