

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुराग बसू दिग्दर्शित आगामी 'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे नुकतेच समोर आले होते. आता या चित्रपटात अभिनेत्री जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत दिसू शकते, अशी चर्चा आहे. जेनिफरने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे सर्व काही सुरळीत पार पडले तर या चित्रपटाद्वार जेनिफरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण होऊ शकते. अर्थात, अद्याप अधिकृतरीत्या कुणीही याविषयी काही माहिती दिलेली नाही.
जेनिफरची स्वतःची अशी वेगळी फॅन फॉलोईंग आहे. अनुराग बसू म्हणाले की, मी देखील ही अफवा ऐकली आहे. पण अद्याप काहीही ठरलेले नाही. 'कसौटी जिंदगी की', 'सरस्वतीचंद्र', 'बेहद' आणि 'बेपनाह' या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. आमीर खानच्या 'अकेले हम अकेले तुम' मधून बालकलाकार म्हणून जेनिफरने काम केले होते.