Nirvair Singh Death : पंजाबी गायक निर्वैर सिंहचा भीषण अपघातात मृत्यू | पुढारी

Nirvair Singh Death : पंजाबी गायक निर्वैर सिंहचा भीषण अपघातात मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धू मूसेवाला यांच्या मृत्यूनंतर पंजाबी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक निर्वैर सिंह याचा (Nirvair Singh Death) ऑस्ट्रेलियातील भीषण कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासोबतच एका महिलेसह दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी निर्वैर सिंहच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणावरही आरोप करण्यात आलेला नाही. निर्वैर सिंह नऊ वर्षांपूर्वी आपल्या करिअरसाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. मंगळवारी (३१ ऑगस्ट) रोजी ऑस्ट्रेलियातील रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Nirvair Singh Death)

मेलबर्नमध्ये मंगळवारी तीन वाहनांची टक्कर झाली होती. या प्रकरणी एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर कोणताही आरोप लावलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने आणि तिन्ही वाहनांची धडक बसल्याने हा अपघात झाला.

त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना धक्का बसला आहे. पंजाबी गायक गगन कोकरी यांनी निर्वैर सिंह निधनानंतर शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्ट करत म्हटले, ‘मी नुकतीच ही धक्कादायक बातमी ऐकली आहे. आम्ही दोघांनी मिळून टॅक्सी चालवली. आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र गाणं गायलं. तुझे ‘तेरे बिना’ हे गाणे आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट गाणे होते. तू खूप छान माणूस होतास. मी तुला कधीच विसरू शकत नाही.’

कोण होता निर्वैर सिंह?

आम्ही तुम्हाला सांगतो की, निर्वैर हा प्रसिद्ध पंजाबी गायक होता. ‘माय टर्न’ या अल्बममधील त्याचे ‘तेरे बिना’ हे गाणे खूप गाजले. ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाल्यानंतर, त्याने लग्न केले. त्याला दोन मुले आहेत.

 

Back to top button