VJ Mahalakshmi : अभिनेत्री महालक्ष्मी अडकली विवाहबंधनात; निर्माता रवींद्र चंद्रशेखरन सोबत बांधली लग्नगाठ

VJ Mahalakshmi : अभिनेत्री महालक्ष्मी अडकली विवाहबंधनात; निर्माता रवींद्र चंद्रशेखरन सोबत बांधली लग्नगाठ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री व्ही. जे. महालक्ष्मी (VJ Mahalakshmi) ही निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्या सोबत विवाहबंधनात अडकली. गुरुवारी (दि. १ सप्टेंबर) दोघांनी जवळचे नातेवाईक व मोजक्याच मित्रमंडळींच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात हार घालून पती पत्नी म्हणून एकमेकांना स्विकारले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वच समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच यांच्या लग्नानंतर सारेचजण या नववधु वराचे कौतुक देखिल करत आहेत.

व्ही. जे. महालक्ष्मीही (VJ Mahalakshmi) दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे व खासकरुन टेलिव्हीजन क्षेत्रात तिचा दबदबा आहे. तिच्या वाणी राणी, ऑफीस, चेल्लमे, उथिरीपोक्कल आणि ओरु कोई ओसाई या टीव्ही मालिका खूप गाजल्या आहेत. या मालिकांमुळे ती दक्षिणेत अगदी घराघरात पोहचली आहे. तसेच चित्रपट निर्माते म्हणून रवींद्र चंद्रशेखरन देखिल साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. चंद्रशेखरन यांनी 'नटपुना एन्नानु थेरीयुमा', 'मुरुंगाक्काई चिप्स' या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

दोघांनी देखिल आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच तमाम सिने रसिकांकडून त्यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद कमेंट्सद्वारे मिळत आहेत. रवींद्र चंद्रशेखरन आणि व्ही. जे. महालक्ष्मी यांचे पुर्वी लग्न झाले होते. दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.

महालक्ष्मीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शन लिहली आहे. की, 'मी खूप भाग्यशाली आहे की, आपण माझ्या आयुष्यात आलात, तुम्ही तुमच्या उबदार प्रेमाणे माझ्या आयुष्यात रंग भरले आहेत' अशी भावना आपले पती रवींद्र यांच्या बाबत महालक्ष्मीने व्यक्त केल्या आहेत.

खरतर हा एक अनोखा विवाह सोहळा ठरला आहे. कारण, प्रस्तापित व्यवस्थेनुसार किंवा समजानुसार या जोडीला विजोडच ठरवले जाईल. महालक्ष्मीही अभिनेत्री असल्याने स्वाभाविकच एक सौदर्यंवती आहे. पण, दुसरीकडे चंद्रशेखरन हे खूपच लठ्ठ आहेत. अर्थात त्यांचे वजन खूप असल्याने ते एक वजनदार व्यक्ती आहेत. पण, सर्वसामान्य लोकांप्रमाणे चंद्रशेखरन यांना देखिल महालक्ष्मी हिने त्यांच्याशी विवाह करणे त्यांना स्वत:ला देखिल आश्चर्यकारक वाटत आहे.

रवींद्र चंद्रशेखरन यांनी आपल्या लग्नाचे फोटो फेसबुकवर शेअर करुन त्यांच्या प्रकृतीला अनुसरुन स्वत:च लिहले आहे, की 'महालक्ष्मी सारखी गोड मुलगी माझ्या आयुष्यात येणं हे एक माझ्यासाठी भाग्यासारखं आहे. तर तिच्यासाठी ते भाग्यशाली असेल का? याचं उत्तर लवकरच कळेल 'Fat Man Facts' मध्ये…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news