पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशांत शिंगटे निर्मित आणि रंजीत दशरथ जाधव दिग्दर्शित 'का रं देवा हा' या चित्रपटातून मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल ( Monalisa Bagal) नावारूपास आली आहे. सध्या गणेश चतुर्थी सर्वत्र मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरा होत आहेत. याच दरम्यान अनेक मराठी कालाकारांसह अभिनेत्री मोनालिसा बागलनेही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला आहे. यावेळीच्या तिच्या मराठमोळ्या लूक चर्चेत आला आहे.
अभिनेत्री मोनालिसा बागलने ( Monalisa Bagal ) नुकतेच गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे. यावेळी तिने मराठमोळ्या साजशृंगार करून गणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे. नटून- थटून आवडत्या बाप्पा स्वत: हाताने घेवून येत एका झाडाखाली विराजमान करताना मोनालिसा एकदम हटके दिसली. यावेळी तिने केलेली सजावट, लूक आणि गणेशाची मुर्ती सर्वच काही आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. यावेळीच्या आजूबाजूच्या सजावटीमध्ये एक भले मोठे झाड, फुलांच्या माळा, समई, आरती, फुलांचे झुबंर, एक कंदील आणि बेलगाडीच्या चाकावर फुलांची सजावट खूपच सुरेख दिसत होती. मोनालिसांने हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
यातील खास म्हणजे, मोनालिसाने झाडांच्या एका बुध्यांवर पाट ठेवून गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. शेअर झालेल्या व्हिडिओत बॅकग्राऊडला 'चोर पावलांनी आले बाप्पा, शेंदुर मस्तकी लावून टिळा, माझा बाप्पा किती गोड दिसतो….' हे गाणे वाजत आहे. यासोबत तिच्या मराठमोळ्या लूकही चर्चेत आला आहे. यासोबत तिने केलेल्या झेंडूच्या फुलांची सजावटदेखील खूपच जबरदस्त होती.
यावेळी तिने निळ्या रंगाच्या नऊवारी पैठणीसोबत गुलांबी रंगाचे ब्लॉऊज परिधान केले आहे. केसांच्या अंबाडा, केसात गजरा, नाकात नथ, हातात मोठ्या सोन्याच्या बांगड्या, गळ्याचे सोन्याचा हार, कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'सज -धजके जाऊॅ सबको उगली पे नचाऊॅ, पतली गल्ली पथडी मुझे हात नको लावू. ऐसे छप्पन हे लाईन मैं छोरे, हर कोई….'. असे गाणे वाजत आहे.
या फोटोला मोनालिसाने 'Dear बाप्पा, न मागता ही खूप काही देतोस, तुझं प्रेम असंच कायम सोबत राहू दे…' असे म्हणत हॅसटॅग Ganpati Bappa Moraya असे लिहिले आहे. यावरून मोनालिसाने गणेशाचे धुमधडाक्यात स्वागत केल्यEचे दिसतेय. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करत आहेत. कॉमेन्टस करताना चाहत्यांनी मोनालिसाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.