नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मात्र सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनाली फोगाट यांची बहिण रमन यांनी माझ्या बहिणीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होउ शकत नाही. कारण ती आरोग्याच्या दृष्टीने फिट होती, असे म्हटले आहे. दरम्यान फोगाट परिवाराने सोनाली यांच्या मृत्यूची सीबीआय तपासाची मागणी केली आहे.
मंगळवारी ( दि.२४) भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृत्यू हृद विकाराच्या झटक्याने झाल्याचे प्रथम सांगण्यात आले. मात्र सोनाली आरोग्याच्या दृष्टीने फिट होती. त्यामुळे तिचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू होणारच नाही, असा दावा त्यांची बहिण रमन यांनी केला आहे. माझे कुटुंबीयही साेनालीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे मान्य करायला तयार नाहीत, कारण तिला कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती.
सोनाली फोगाट यांनी कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात आदमपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. बिश्नोई त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. मात्र सध्या ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. सोनाली फोगाट या बिग बॉस या रियालिटी शो मधून खूप प्रसिध्द झाल्या होत्या. बिग बॉस मध्ये रूबीना आणि निक्की तांबोली सोबतचा त्यांचा वाद चर्चेत आला होता. त्यावेळी बिग बॉसच्या घरात असताना सोनाली फोगाट यांनी निक्की तांबोली आणि रुबीना यांना बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यावर बघून घेण्याची धमकी दिली होती. ज्यावर सलमान खान भडकला होता. त्याने यावेळी फोगाट यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.
हेही वाचा :