athiya shetty-kl rahul : केएल राहुल-अथिया शेट्टी झाले नव्या घरात शिफ्ट! | पुढारी

athiya shetty-kl rahul : केएल राहुल-अथिया शेट्टी झाले नव्या घरात शिफ्ट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपटू  केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी दीर्घकाळ एकमेकांना डेट करत आहेत, हे सर्वश्रृत आहे. (athiya shetty-kl rahul) सध्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत. चाहते  दोघांच्या लग्नाची वाट पाहत असतानाच, दोघांनीही एकत्र राहायला सुरुवात केल्याची बातमी समोर येत आहे. नव्या घरात दोघांनी गृहप्रवेश केल्याचे म्हटलं जात आहे. (athiya shetty-kl rahul)

जिथे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करतात. त्याचवेळी अथिया शेट्टी आणि केएल राहुल त्यांच्या नात्याबद्दल खूप मोकळेपणे बोलतात. या दोघांशी संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.

या कपलने मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले अ आहे. दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सुरु असताना आपल्या नवीन घरात ते एकत्र राहू लागले आहेत. अथियाला या नवीन घरात शिफ्ट होऊन एक आठवडा झाला आहे आणि ती सध्या केएल राहुलच्या आगमनापूर्वी घर सजवत असल्याची माहितीही समोर आलीय.

वडिलांनी घरात गृहप्रवेश पूजा केली

अथियाचे आई-वडील, अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांनीही जुलैमध्ये या घराची गृहप्रवेश पूजा केली होती. अथिया आणि केएल राहुलच्या बाँडबद्दल बोलताना दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता अथिया शेट्टी आणि केएल राहुल कधी लग्न करणार, याची प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली आहे.

हेही वाचा :  

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

Back to top button