Jailer First Look: दाढी, डोळ्यावर चष्मा...'जेलर' रजनीकांतचा लूक चर्चेत | पुढारी

Jailer First Look: दाढी, डोळ्यावर चष्मा...'जेलर' रजनीकांतचा लूक चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. (Jailer First Look)रजनीकांतची स्टाईल पाहूनच क्षणात वाटते की, त्यांच्याशी पंगा घेणं धोकादायक ठरू शकतं. दाढी, डोळ्यावर चष्मा… रागीट भाव असा ‘जेलर’ मधील रजनीकांतचा लूक सध्या चर्चेत आहे. (Jailer First Look)

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सोमवारी, निर्मात्यांनी हा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, ज्यामध्ये रजनीकांतचा जबरदस्त लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. ७१ वर्षीय रजनीकांत या पोस्टरमध्ये खूपच गंभीर दिसत आहेत.

ट्विटरवर फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना सन पिक्चर्सनेही सोमवारपासून जेलरचे शूटिंग सुरू होत असल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही नेल्सन दिलीप कुमार यांनी दिले आहे. थलैवा रजनीकांतचा मागील चित्रपट ‘अन्नाथे’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सुपरस्टार तामिळ अभिनेत्याचा १६९ वा चित्रपट आहे.

‘जेलर’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन होऊ शकते कास्ट

‘जेलर’ हा एक ॲक्शन चित्रपट असून, यात रजनीकांतसोबत ‘बाहुबली’ फेम रम्या कृष्णन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हैदराबादमध्ये होणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त या चित्रपटात शिवराजकुमार देखील आहेत, जे नकारात्मक भूमिकेत असतील. नुकतेच ‘जेलर’ बद्दल अशीही बातमी आली होती की, ऐश्वर्या राय बच्चन देखील यामध्ये कास्ट करण्याच्या तयारीत आहे. तथापि, अद्याप याबाबत वृत्त समोर आलेले नाही.

Back to top button