हिंगोली: अखेरच्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी | पुढारी

हिंगोली: अखेरच्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात चौथ्या आणि अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक दाखल झाले आहेत. दर्शन पास व्यवस्था बंद करण्यात आल्याने भाविकांच्या मोठ्या रांगा आज पहाटेपासून लागल्या होत्या.

श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संस्थानकडून चोख दर्शन व्यवस्था ठेवल्याने सुरळीतपणे भाविकांना दर्शन घेता येत होते. संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. कृष्ण कानगुले, अध्यक्ष वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button