Rahul Deshpande Controversy : अमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’चे कौतुक राहुल देशपांडेला भोवले | पुढारी

Rahul Deshpande Controversy : अमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’चे कौतुक राहुल देशपांडेला भोवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल देशपांडे (Rahul Deshpande Controversy) याला अवघा महाराष्ट्र ओळखतो. सुप्रसिद्ध गायक म्हणून तो सर्वश्रुत आहे. नुकतेच त्याचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने त्याने अवघ्या महाराष्ट्राला भूरळ घातली आहे. महाराष्ट्राचा हा लाडका गायक सध्या सोशल मीडियावर मात्र चांगलाच ट्रोल होत आहे. नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया पेजवरुन अमिर खान याच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाचे कौतुक केले होते. यानंतर त्याला प्रंचड ट्रोल करण्यात आले. आता या प्रकरणावर त्याने आपले म्हणणे मांडले आहे. ट्रोलर्सना उत्तर देताना त्याने समाज माध्यामतून आपल्या भूमिका मांडली आहे.

अमिरा खान याने आपल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवला होता. या शोसाठी त्याने गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande Controversy) याला निमंत्रित केले होते. या प्रिमियर शो नंतर राहुल देशपांडे याने अमिर खान सोबत फोटो काढला. तसेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याने या चित्रपटाचे कौतुक देखिल केले. राहुल देशपांडे याने आमिर खान यांच्या चित्रपटाचे केलेले कौतुक त्याच्या चाहत्यांना व काही नेटकऱ्यांना अजिबात पसंद पडलेले नाही. या पोस्ट नंतर राहुल देशपांडे याला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या ट्रोलर्सना उत्तर देताना राहुल देशपांडे याने पुन्हा आपली भूमिका सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.

लाल सिंग चढ्ढा या पोस्टवरुन राहुल देशपांडेवर उठलेल्या वादंगानंतर राहुल देशपांडे याने पोस्ट लिहून म्हटले आहे, ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पुर्णत: अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमियरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी यापुर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करुन घेऊ नये, अशी आपणांसर्वांकडे नम्र विनंती.’

Back to top button