Bigg Boss OTT : बिग बॉसच्या घरात सनी लिओनीची एन्ट्री | पुढारी

Bigg Boss OTT : बिग बॉसच्या घरात सनी लिओनीची एन्ट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जेव्हा-जेव्हा टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस (Bigg Boss OTT) चा टीआरपी कमी झाला. तेव्हा निर्मात्यांनी असे काही ट्विस्ट निर्माण केले की त्यामुळे अचानक शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त धमाल निर्माण झाली आहे. यावेळीही शोचे निर्माते असेच काही करणार आहेत. म्हणजेच एक्स पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच Bigg Boss OTT मध्ये प्रवेश करणार आहे.

बिग बॉसच्या घरात सनी लिओनीची एन्ट्री ( Bigg Boss OTT )

हॉट स्टार सनी लिओनी लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये प्रवेश करू शकते. खुद्द सनीने याबाबत खुलासा केला आहे. सनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून स्पर्धकांमध्ये वादावादी लावण्यास कबंर कसणार आहे. तिने एक व्हिडिओ जारी करून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही खूप आनंदी आहेत.

सनी लिओनी बिग बॉस ओटीटीबद्दल उत्साहित

बिग बॉसच्या घरात सनीला पाहून प्रत्येकजण खूप उत्साहित आहे. मात्र, यावेळी ती स्पर्धक म्हणून नाही तर पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. सनीने तिच्या आगमनापूर्वी इंस्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती देखील खूप उत्साहित दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सनी म्हणते की मी बिग बॉस ओटीटीसाठी खूप उत्साहित आहे. आता ती शेवटी पाहुणी म्हणून एकटीच या शोमध्ये प्रवेश करते की तिच्यासाेबत पती डॅनियल सुद्धा एंट्री करेल याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे

सनी लिओनीचे चित्रपट कमी पण चाहते जास्त

सनी लिओनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये फार कमी काम केले आहे, परंतु ती एक अशी अभिनेत्री आहे की, तिचे प्रचंड चाहते आहेत. बिग बॉसच्या सीझन ५ मध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोमध्ये तिने आपली खास ओळख निर्माण केली होती. या शाेनंतर बॉलिवूडमध्ये तिची मागणी अचानक वाढली.

बिग बॉसच्या (Bigg Boss OTT) या ओटीटी प्लॅटफार्ममध्ये करण जोहर होस्ट करत आहेत. या शाेचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. हा शो लवकरच टीव्हीवरही प्रसारित होणार आहे. कलर्स वाहिनीने नुकताच त्याचा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री रेखाचा आवाजही ऐकू येत आहे. हॉट स्टार सनीच्या एंट्रीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Back to top button