‘मी होणार सुपरस्टार’ महाअंतिम सोहळ्यात रंगणार महाजुगलबंदी | पुढारी

‘मी होणार सुपरस्टार' महाअंतिम सोहळ्यात रंगणार महाजुगलबंदी

पुढारी ऑनलाईन : गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचे टॅलेंट सिद्ध करता यावं यासाठी हक्काचा मंच छोटा पडद्यावर पाहायला मिळाला आहे. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास. तो म्हणजे, मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा. वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी चार वर्षांच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि दाेन टीमनी आता महाअंतिम फेरीची उंची गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २१ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार? याची उत्सुकता वाढली आहे.

Displaying superstar 1.PNG

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांमधली महाजुगलबंदी पाहायला मिळणार आहे आणि सोबतीला ‘दगडी चाळ २’ च्या टीमने खास हजेरी लावत या सोहळ्याची शान वाढवली आहे. मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजेच २१ ऑगस्टला रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Displaying superstar 2.PNG

हेही वाचलंत का? 

Displaying superstar 4.PNG

Displaying superstar 3.PNG

Back to top button