Organ Donation Day : हो…आता मी अवयव दाता आहे! अभिनेत्री जुई गडकरीच्या अवयव दानाचं होतयं कौतुक

Organ Donation Day
Organ Donation Day

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहावरील 'पुढचं पाऊल', 'सरस्वती', 'बिग बॉस मराठी' फेम मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीची (Jui Gadkari) एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. जुई अलिकडच्या काही वर्षात अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आज जागतिक अवयव दिन (Organ Donation Day ) यानिमित्त तिने सोशल मीडियावर आपल्या अवयवदानाचा किस्सा सांगितला आहे.

Organ Donation Day

दान विविध स्वरुपात करता येत. उदा. रक्तदान, अन्नदान, अवयव दान, देहदान आदी स्वरुपात करता येते. पण आपण करत असलेले दान ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. आज 'जागतिक अवयव दान दिवस' आणि एखाद्याचं अवयव दान हे कोणाच्यातरी आनंदी जगण्याच कारणं बनत असते, एखाद्याला जगण्याची उमेद मिळून जाते. वय वर्ष १८ पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती अवयव दान करू शकते. मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीनेही आपल्या अवयवदानाबद्दलचा किस्सा आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हो…आता मी ऑर्गन डोनर आहे! हो…आता मी ऑर्गन डोनर आहे!

Organ Donation Day : आता मी ऑर्गन डोनर 

जुईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, "कुठल्याही हॉस्पिटलला एक विभाग असतो, तो म्हणजे 'Organ Transplant'. त्यासमोर बरीच मोठी रांग असते. लोक हातात जाडजूड फाईल्स घेऊन ताटकळत ऊभे असतात. organ transplant साठी नंबर लावावा लागते म्हणे. आपल्या रक्तगटाचा अवयव मिळेपर्यंत वाट बघावी लागते. मग वेगवेगळ्या एनजीओकडून त्या सर्जरीसाठी पैशाची जमवाजमव करावी लागते. एकूणच सगळं खूप तणावाचं काम असतं. वेळेत अवयव मिळाला तर ठीक नाहीतर……" ती पुढे लिहते, "या सगळ्या गोष्टी बघून मनात नेहमी प्रश्नं यायचे. आपण कशी मदत करू शकतो? आपला कसा उपयोग होईल? मग २०१३ साली माहिती काढली आणि सरळ जाऊन नाव नोंदवलं अवयवदानासाठी ! हो!!! आता मी Organ Donor आहे! आणि आज आंतरराष्ट्रीय अवयव दान दिन आहे !! माझ्या सारख्या असंख्य अवयव दात्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा!! हो, शुभेच्छाच! कारण आपण गेल्यावर आपल्या अवयवांमुळे कोणाचं तरी आयुष्य खूप सकारात्मक बदलेल.
अवयव दाता त्याच्या मुर्त्यूनंतर ह्रदय, आंत्र/आतडे, किडनी, लिव्हर, यकृत, स्वादुपिंड, फुफ्फस दान करु शकतो, आणि मी अभिमानाने सांगते की, मी हे अवयव दान केले आहेत. अवयव दान संबधित माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता किंवा विभागीय रोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Centre-ZTCC) कडे माहिती घेऊ शकता.
तू कौतुकास्पद आहेस
जुईच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कॉमेंट केल्या आहेत. तिचं कौतुक केलं आहे, "शब्दात वर्णन करणे अवघड आहे.. पण खूप हिंमतवाली धाडसी आणि दिलदार व्यक्तिमत्त्व आहेस, तू  कौतुकास्पद आहेस, 
सात्त्विक विचार"
हेही वाचलंता का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news