‘फॉरेस्ट गम्प’साठी अमेरिकेत ‘लाल सिंग चढ्ढा’चा स्पेशल शो | पुढारी

‘फॉरेस्ट गम्प’साठी अमेरिकेत ‘लाल सिंग चढ्ढा’चा स्पेशल शो

पुढारी ऑनलाईन

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हॉलीवूडचा सर्वांग सुंदर चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने रिमेक केला आहे आणि हा चित्रपट देशात 14 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ हा चित्रपट आता ‘कल्ट क्लासिक’ ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे ऑस्करही मिळाले.

आता आमिर खानने टॉम हँक्ससाठी त्याच्या ‘लाल सिंग चढ्ढा’चा खास शो अमेरिकेत आयोजित करण्याचे ठरवले आहे. भारतात रीलिज आधीच हे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्याचे नियोजन आहे. टॉम हँक्सने हा चित्रपट पाहावा आणि आपले मत नोंदवावे, असे आमिरला वाटते.

‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये करिना कपूर-खान, नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Back to top button