Parineeti Chopra : परिणीती-हार्डी संधूच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज | पुढारी

Parineeti Chopra : परिणीती-हार्डी संधूच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. (Parineeti Chopra) तिने  रणवीर सिंहसोबत लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. परिणीतीने इश्कबाज, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, जबरिया जोडी, संदीप और पिंकी फरार, द गर्ल ऑन द ट्रेन, मेरी प्यारी बिंदू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री लवकरच गायक अभिनेता हार्डी संधूसोबत दिसणार आहे. अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टचे पोस्टर शेअर केले आहे. अभिनेत्रीने लेटेस्ट पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तिने कमिंग सून असे लिहिले आहे. (Parineeti Chopra )

सिक्रेट ऑफ गावस्कर : या क्राईम वेब सीरीजमध्ये दिसणार तगडे कलाकार

फोटोच्या पार्श्वभूमीवर तिरंगा दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. मात्र, या शीर्षक नसलेल्या चित्रपटाबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परिणीती आणि हार्डी संधूच्या अनटायटल चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. पोस्टर पाहता परिणीती आणि हार्दिकचा आगामी प्रोजेक्ट देशभक्तीशी निगडीत असल्याचे दिसते. परिणीती आणि हार्दिक पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

परिणीती चोप्रा सायना चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित होता. ही अभिनेत्री लवकरच सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाईयां’मध्ये दिसणार आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, नीना गुप्ता, बोमन इराणी असे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हार्डी संधू रणवीर सिंगच्या ८३ चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा :

Back to top button