बिग बॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता 'ररा' लघुपटात | पुढारी

बिग बॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता 'ररा' लघुपटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवगर्जना क्रिएशन्स प्रस्तुत सचिन गवळी लिखित/दिग्दर्शित ‘ररा’ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवत आहेत. या शॉर्ट फिल्म मध्ये बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे, बालकलाकार पार्श्र्वी आणि सचिन गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

तसेच गणेश शेजवळ, स्वप्नील गुडेकर, मच्छिंद्र बोरगुडे आणि यश जगताप हे सहकलाकार आहेत. कॅमेरा सचिन केदारी, केतन चिकणे तर प्रॉडक्शनची जबाबदारी निखिल खांदवे, अभय पोते, स्नेहलराज कारंडे, प्रणाली साबळे तसेच मेकअप नवीन परमार आणि शिवाजी गोडे यांनी केला. लवकरच ‘ररा’ही हिंदी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Back to top button