चर्चा कॅटरिनाच्या ड्रेसच्या किमतीची… | पुढारी

चर्चा कॅटरिनाच्या ड्रेसच्या किमतीची...

कॅटरिना कैफ ही ‘बी टाऊन’मधील अशी अभिनेत्री आहे जी देशी असो वा विदेशी दोन्ही प्रकारच्या पोशाखात उठून दिसते. दोन्ही प्रकारचे आऊटफिटस् कसे कॅरी करायचे याची उत्तम जाण तिला आहे. नुकतेच कॅटने तिचे काही लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात तिने फ्लोरल ड्रेस परिधान केलेला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गौरी खानसोबत काही स्पेशल घेऊन येत आहे.’ कॅटरिनाच्या या ड्रेसची किंमत आहे 88 हजार 555 रुपये! विशेष म्हणजे, ही किंमत डिस्काऊंटसह आहे. सध्या विकी कौशलसोबत संसारात रमलेल्या कॅटरिनाचा आगामी काळात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा, आलिया भट्टसोबत ती ‘जी ले जरा’मध्येही आहे.

Back to top button