Mouni Roy : मौनीचा व्हाईट ब्ल्यू बिकिनीत गॉर्जियस लूक | पुढारी

Mouni Roy : मौनीचा व्हाईट ब्ल्यू बिकिनीत गॉर्जियस लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मौनी रॉयने (Mouni Roy) आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर टीव्ही ते सिनेमा असा प्रवास केला आहे. मौनीला बॉलिवूडमध्ये खास ओळखीची गरज नाही. कारण, छोट्या पडद्यावरून तिने आपली एक खास प्रतिमा निर्माण केलीय. ‘नागिन’ या टीव्ही मालिकेतून ती घराघरात पोहोचली. मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने बिकिनीत फोटोशूट केले आहे. तिचे फोटोशूट पाहिल्यानंतर तिचा गॉर्जियस लूक पाहून तुम्हालाही कमेंट करण्याचा मोह आवरणार नाही. (Mouni Roy)

मौनी रॉय कधी देसी तर कधी वेस्टर्न आउटफिट्समध्ये असते. अलीकडेच मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते की मौनीने व्हाईट-ब्ल्यू कलर बिकिनी घातलीय. सोबत एक व्हाईट श्रगदेखील घातला आहे. मौनीने या ड्रेससोबत वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

लेटेस्ट फोटोंमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते भकरभरून कमेंट्स करत आहेत. अभिनेत्रीच्या किलर लूकवर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक यूजर्स मौनीच्या या लूकवर फायर आणि हार्ट इमोजी बनवत आहेत, तर अनेक महिला चाहत्यांनी मौनीसारखा ड्रेस घालण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मौनी रॉयचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा एक काल्पनिक चित्रपट आहे. त्याची कथा पौराणिक कथांशी निगडित आहे. काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जीने या चित्रपटाच्या नावाशी आणि त्याच्या कथेशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. या चित्रपटात मौनीने रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button