Gautami Deshpande : गौतमीचा डिपनेक ब्लाऊज; साडीत बोल्ड झाली सई

Gautami Deshpande
Gautami Deshpande
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माझा होशील ना' फेम आणि मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande) एकापेक्षा एक फोटोशूट करून सोशल मीडियात सक्रिय असते. सध्या तिने आणखी एका मराठमोळ्या लूकने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची धाकटी बहीण आहे.

छोट्या पडद्यावर 'माझा होशील ना' या मालिकेतून गौतमी चाहत्याच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेत तिने 'सई' नावाची उत्तम भूमिका साकारली आहे. गौतमीसोबत या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी दिसला आहे. उत्तम अभिनयसोबत ती चांगली डान्सरदेखील आहे. याच दरम्यान गौतमीने ( Gautami Deshpande ) तिच्या इंन्स्टाग्रामवर एकापैक्षा एक मराठमोळा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

सध्या गौतमीच्या सिमरी निळ्या रंगाच्या साडीसोबत डिपनेक ब्लाऊजच्या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोला तिने 'Smile and six yards of authenticity can't be replaced! ❤️'. कॅप्शन लिहिली आहे. यातील खास म्हणजे, गौतमीने स्वत: च कमरेवर हात ठेवत निखल हास्यत पोझ दिली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टस पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'Absolute beauty', 'So beautiful', 'क्यूट', 'Omggg!!! Glamorous' , 'Mast', 'निखळ हास्याची जादू', 'ब्यूटीफुल', 'कडक', 'Hot'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याच दरम्यान तिने आणखी एका निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत खास करून गौतमी एका खिडकीजवळ उभारून हटके पोझ दिसत आहे. या फोटोला 'क्या नजारे क्या सितारे सबको हैं इतजार कब तुम आआगे', 'Super gorgeous', 'Beautiful','खूप सुंदर दिसतेस गौतमी', 'नुसती cuteeeee' यासारख्या अनेक कॉमेन्टस चाहत्यांनी केल्या आहेत. यासोबत काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 


\

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news