अल्लू अर्जुन बॉलीवूडमध्ये येणार | पुढारी

अल्लू अर्जुन बॉलीवूडमध्ये येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘आर्या’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत स्टायलिश स्टार तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची फॅन फॉलोईंग प्रचंड प्रमाणात वाढतच गेली आहे. अगदी हिंदी पट्ट्यासह महाराष्ट्रातही अल्लूचा असा एक चाहता वर्ग आहे. त्याचे चित्रपट हिंदी डब होऊन किंवा मूळ भाषेत हिंदी पट्ट्यात रीलिज होत असतातच; पण आता तो स्वतःच बॉलीवूडमध्ये डेब्यू करू शकतो. नुकत्याच एका मुलाखतीत अल्लू म्हणाला की, बॉलीवूडमध्ये काम करणे माझ्यासाठी सोपे नाही. हिंदीत काम करणे माझ्या कम्फर्ट झोनपासून थोडे बाहेर आहे. पण गरज असेल तेव्हा मी कम्फर्ट झोन सोडू शकतो. योग्य संधी मिळाल्यास सर्व काही करण्यास तयार आहे.

अल्लूच्या या वक्तव्यानंतर त्याच्या बॉलीवूड डेब्यूचे वेध त्याच्या चाहत्यांना लागले आहेत. (अर्थात आता बहुतांश मोठे चित्रपट हे पॅन इंडिया असतात. त्यामुळे बॉलीवूडसह इतर इंडस्ट्रींमध्ये तसाही फारसा फरक राहिलेला नाही) असो. आगामी काळात अल्लू त्याच्या ‘पुष्पा ः द रूल’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ‘पुष्पा ः द राईज’चा पुढचा भाग आहे.

 

Back to top button