Sushmita Sen : 11 'बॉयफ्रेंड' अन् 12 व्या सोबत लग्नगाठ?, सुष्मिता सेनची ही कथित अफेअर्स तुम्हाला माहितीयत का? | पुढारी

Sushmita Sen : 11 'बॉयफ्रेंड' अन् 12 व्या सोबत लग्नगाठ?, सुष्मिता सेनची ही कथित अफेअर्स तुम्हाला माहितीयत का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

19

18

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिने आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या विवाह केल्याची जोरदार चर्चा आहे. स्वत: ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवरून याचा फोटोसह खुलासा केल्याचे समोर आले आहे. मिस युनिव्हर्स नंतर सुष्मिता प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने बॉलिवूड सारख्या चंदेरी दुनियेत प्रदार्पण केले. इथून पुढे सुष्मिताचे अनेक मित्र झाले, त्यातील काहींशी तिचे सुत जुळत गेले. तिच्या अफेअर्सची चर्चा होत राहिली पण सुष्मिताने कधीही तिच्या बॉयफ्रेंडशी लग्नगाठ बांधली नाही. सध्या सुष्मिता ४६ वर्षांची आहे. अखेर तिने मनी लाँड्रींगचे आरोप असणा-या आणि भारतातून पळून गेलेल्या ललित मोदी याच्याशी संसार थाटल्याचे समोर आले आहे. . पण या विषयीच्या बातम्या समोर येताच ललित मोदीने पुन्हा दुसरे ट्विट करत आमचे लग्न झाले नसून आम्ही दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला.

सुष्मिताने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत तिची 11 अफेअर्स झाली आहेत अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, यातील 6 जण हे सुष्मिता हून 15 वर्षांनी लहान आहेत, तर 5 जणांचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त आहे. चला तर सुष्मिताच्या आयुष्यात आलेल्या या 11 लोकांबद्दल जाणून घेऊया…

सुष्मिता सेनचे नाव तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठे असणारे उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी जोडले गेल्याचे बोलले गेले. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर जेव्हा सुष्मिताने इव्हेंट्समध्ये जायला सुरुवात केली, तेव्हाच एका कार्यक्रमात तिची अनिल अंबानींसोबत ओळख झाली. अनिल अंबानी यांनी अभिनेत्रीला 22 कॅरेटची हिऱ्याची अंगठीही भेट दिली होती. पण नंतर अंबानींनी कुटुंबाच्या सांगण्यावरून सुष्मितापासून फारकत घेतली, अशी चर्चा आहे.

सुष्मिताचे नाव चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत जोडले गेले. सुष्मिताच्या ‘दस्तक’ या डेब्यू चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली होती. या चित्रपटादरम्यान सुष्मिता तिच्याहून सात वर्षांनी मोठा आणि विवाहित असणा-या विक्रमच्या प्रेमात पडली. विक्रम भट्ट यांना विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र, परिस्थिती बिघडण्याआधीच विक्रमने सुष्मितापासून दूर राहणे पसंत केले.

सुष्मिताचे नाव तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेला अभिनेता रणदीप हुड्डासोबत जोडले गेले. दोघेही जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र ब्रेकअपनंतर रणदीपने सुष्मितासाठी खूप कटू शब्द वापरले होते. त्याने एका संभाषणात सांगितले की, “मी मिस युनिव्हर्ससोबत रिलेशनशिपमध्ये नव्हतो आणि मला विजयाची कोणतीही भावना वाटत नव्हती. मी माझ्या आयुष्यात फक्त थिएटर रिहर्सल चुकवल्या आहेत. कारण सुष्मिताची इच्छा होती की मी तिथे जाऊ नये आणि माझ्या मूल्य प्रणालीमध्ये मी केलेली ही सर्वात वाईट गोष्ट आहे.” रणदीपने सुष्मिताशी झालेले ब्रेकअप ही त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट असल्याचेही म्हटले होते.

सुष्मिता सेनचे अफेअर दिग्दर्शक मुदस्सर अजीजसोबत होते, जो तिच्या पेक्षा वयाने 8 वर्षांनी लहान होता. ‘दुल्हा मिल गया’ चित्रपटादरम्यान दोघे जवळ आले. मात्र, काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर झालेल्या एका संभाषणात मुदस्सरने सुष्मिताचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, “ती खूप छान व्यक्ती आहे आणि तिने तिच्या आयुष्यात जो काही निर्णय घेतला आहे त्याचा मी आदर करतो. ती तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते. बहुतेक लोक असे करू शकत नाहीत.”

सुष्मिता सेनचे नाव हॉटमेलचे संस्थापक शब्बीर भाटियासोबत जोडले गेले. शब्बीर वयाने सुष्मितापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. शब्बीरने सुष्मिताला 10.5 कॅरेटचा हिराही दिला होता, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. तथापि, सुष्मिताच्या किंवा शब्बीरच्या बाजूने कधीही या नात्याची पुष्टी झाली नाही.

हॉटेल मालक संजय नारंगसोबतही सुष्मिताचे बरेच दिवस अफेअर असल्याची चर्चा होती. जवळजवळ 8 वर्षांहून मोठा असणा-या नारंगसोबत सुष्मिता लग्न करणार होती. मात्र, ते होऊ शकले नाही आणि ते दोघे वेगळे झाले.

सुष्मिता सेन 36 वर्षांची होती जेव्हा ती तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असणा-या उद्योगपती इम्तियाज खत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मीडियामध्ये त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. मात्र, सुष्मिताने यावर कधीही भाष्य केले नाही आणि इम्तियाज तिला आपला चांगला मित्र म्हणत राहिला.

असे म्हटले जाते की सुष्मिता सेनचे अफेअर पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत होते. सुष्मिता 2013 मध्ये जवळपास तिच्या पेक्षा 9 वर्षांनी मोठ्या असणा-या वसीमच्या प्रेमात पडली होती. ते लग्न करणार असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा होती. मात्र, एका संभाषणात सुष्मिताने अफेअरची बातमी फेटाळून लावली होती. माझी ज्या व्यक्तीशी मैत्री असते, त्या व्यक्तीशी माझे नाते जोडले जाते. जेव्हा मी प्रेमात पडेन तेव्हा मी स्वतः तुम्हा लोकांना सांगेन. जाहीर करेन, अशा भावना तिने बोलून दाखवल्या होत्या. दुसरीकडे वसीम अक्रमनेही या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते आणि आपण अशा अफवांना कंटाळलो असल्याचे म्हटले होते.

सुष्मिता सेनचे नाव तिच्यापेक्षा जवळपास दोन वर्षांनी लहान सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सजदेहसोबतही जोडले गेले. बंटी हा सुष्मिताचा मॅनेजर होता. मात्र, सुष्मिताने बंटीसोबतच्या नात्याची बातमी अफवा असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला होता.

सुष्मिताचे नाव प्रसिद्ध रेस्टॉरंट व्यवसाईक हृतिक भसीनसोबतही जोडले गेले. वयाने सुमारे दोन वर्षांनी लहान असलेल्या हृतिकसोबत सुष्मिताचे अफेअर जवळपास 4 वर्षे चालले. झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोघे एकत्र दिसले होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले.

सुष्मिता सेनचे यापूर्वीचे अफेअर नोएडा येथील मॉडेल रोहमन शॉलसोबत होते. रोहमन वयाने सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. 2018 मध्ये दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

Back to top button