Priya Prakash Varrier : सर्वात बोल्ड झाली प्रिया; रेड टॉपमध्ये पलंगावर हॉट अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ( Priya Prakash Varrier ) तिच्या फॅशन सेन्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन नेहमी अॅक्टिव्ह असते. सध्या तिच्या बेडरुम लूकमधील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. याआधी प्रियाच्या डोळा मारण्याच्या व्हिडिओने ती चर्चेत आली होती. अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ( Priya Prakash Varrier ) हिने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर बेडरुममधील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती लाल रंगाच्या ओपन नेकलाइन टॉप आणि गुलाबी रंगाच्या पोल्का डॉट लोअरमध्ये दिसली आहे. तर प्रियाने यावेळी गोल्डन कलरचे कानातले घातले आहेत. प्रियाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या एका युजर्सने संधी मिळवण्यासाठी अभिनय करा, असा पोशाख करू नका. उफ्फ.., अप्रतिम, सुंदर, Gorgeous, Cuteness, Bold and beautiful ❤️❤️🔥🔥🔥, यासारख्या अनेक कटमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही युजर्संनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी प्रिया प्रकाश वारियरचे ३ चित्रपट रिलीज होणार आहेत. प्रियाचा पहिला कन्नड ‘विष्णू प्रिया’ आगामी चित्रपट २५ जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत श्रेयसची मंजू या मुख्य भूमिकेत ती दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्याळम दिग्दर्शक व्हीके प्रकाश यांनी केले आहे. बंगळूर, म्हैसूर आणि चिकमंगळूरसह कर्नाटकातील विविध ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
यानंतर प्रियाचा दुसरा सूरज वर्मा दिग्दर्शित ‘कोल्ला’ आणि तिसरा प्रशांत मांबुली यांच्या ‘श्रीदेवी बंगला’ चित्रपट येणार आहेत. प्रियासोबत बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, प्रियांशू चॅटर्जी आणि मुकेश ऋषी हे कलाकार ‘श्रीदेवी बंगला’ चित्रपटात दिसणार आहेत.
हेही वाचलंत का?
- sushmita sen and lalit modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींनी थाटला संसार? ट्विटरवर फोटो व्हायरल
- disha pardeshi : दिशा बनली कन्याकुमारी, इतकी सुंदर आहे की…
- Priyanka- Nick : निक-प्रियांका जहाजावर एकांतात रोमॅँटिक मूडमध्ये
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram