‘हे आपलं काळीज हाय’ : १४३ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस | पुढारी

'हे आपलं काळीज हाय' : १४३ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दोन दिवसांपासून ‘हे आपलं काळीज हाय’ या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर जनतेने या ‘हे आपलं काळीज हाय’ टॅगलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यांचे काळीज कोण आहे याचा देखील उलगडा कमेंट बॉक्समध्ये केला आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ ही टॅगलाईन १४३ चित्रपटाची आहे.

अधिक वाचा-

चित्रपटात कोण कोणाचे काळीज आहे हे ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ तर्फे उलगडा होणार आहे. १४३ (हे आपलं काळीज हाय) ही विरकुमार शहा यांची निर्मिती आहे.

अधिक वाचा-

या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.

अधिक वाचा-

योगेश भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे.

छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपटाचे पोस्टर हे प्रेमबद्ध कथेला बांधून ठेवणारे आहे. हे पोस्टर पाहताच लक्षात येते.

चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार, याकडे सिनेरसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी आगळ्यावगेळ्या दाक्षिणात्य पद्धतीने चित्रित केल्या आहेत.

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांनाही पूर्णविराम मिळाला आहे. रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता चित्रपटगृहाकडे वळल्या आहेत. यातच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन चित्रपटगृह सुरू झाले.

नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर समोर येईल.

हेदेखील वाचलंत का –

पाहा व्हिडिओ- कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप | Pudhari Edu-disha webinar 2021

Back to top button