पायल रोहतगी लवकरच बोहल्यावर…. | पुढारी

पायल रोहतगी लवकरच बोहल्यावर....

मुंबई ः विकी कौशल-कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर-आलिया भट्ट या बॉलीवूड कलाकारांच्या विवाहानंतरर आणखी एक अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहे. पायल रोहतगी असे तिचे नाव. दीर्घकाळाच्या रिलेशननंतर पायल आता संग्राम सिंहसोबत विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे समजते.

पायल आणि संग्राम हे दोघे येत्या 9 जुलै रोजी आग्रा येथे विवाह करणार असल्याचे समजते. जेपी पॅलेसमध्ये होणारा हा विवाह तीन दिवस चालणार आहे. संग्राम सिंहने विवाहासंदर्भात बोलताना सांगितले की, माझी आणि पायलची पहिली भेट आग्रा-मथुरा मार्गावर झाली. नियतीनेच आमची भेट घडवून आणली आहे. आता आम्ही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button