पिंपरी : पालखी मुक्काम आणि मार्गावर वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवाना गरजेचा

पिंपरी : पालखी मुक्काम आणि मार्गावर वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवाना गरजेचा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना अनिवार्य आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे अनुक्रमे दि. 21 जून आणि 22 जून रोजी महापालिका कार्यक्षेत्रात आगमन होणार आहे. शहरामध्ये दि. 19 ते दि 22 जून या दरम्यान होणार्‍या आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी दुकान किंवा स्टॉल सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात येणार आहे.

हा परवाना ऑनलाईन पद्धतीने काढता येणार असून यासाठी नागरिकांना हीींिीं://लळीं.श्रू/झउचउ दुकानासाठी तात्पुरता परवाना या लिंकवर फॉर्म भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, दुकान किंवा स्टॉल ज्या ठिकाणी उभारायचा आहे, तेथील पत्ता, जवळची खूण, दुकान वैयक्तिक स्तरावर अथवा संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे, त्याबाबत माहिती, दुकानाचे आकारमान, दुकान किंवा स्टॉल सुरू करण्याचे उद्दिष्ट सेवा पुरविणे अथवा व्यवसाय करणे, याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दुकान किंवा स्टॉल उभा करायचा आहे, तेथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा परवाना घेता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news