उर्फी जावेद हिला बिग बॉसच्या घरातून दाखवला बाहेरचा रस्ता | पुढारी

उर्फी जावेद हिला बिग बॉसच्या घरातून दाखवला बाहेरचा रस्ता

पुढारी ऑनलाईन : बिग बॉसच्या घरातून उर्फी जावेदला एलिमिनेट करण्यात आले आहे. बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद हिला बिग बॉसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उर्फी घराबाहेर आल्याने फॅन्स नाराज आहेत. चाहत्यांना निर्मात्यांच्या या निर्णयानंतर धक्का बसला आहे.

बिग बॉस ओटीटी पहिल्या ‘संडे का वार’ एपिसोडमध्ये पहिली स्पर्धक उर्फी एविक्ट झाली. बिग बॉसने तिला शोमधून एविक्ट होण्याचा आदेश दिला.

एविक्शननंतर उर्फी जावेद ट्विटरवर ट्रेंडींग आली. तिच्या एविक्शनमुळे चाहते खुश नाही. तिला घराबाहेर काढणं योग्य नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. तिला पुन्हा शोमध्ये घेण्याची मागणी चाहत्यांकडून होत आहे.

शोच्या तिसऱ्या दिवशी एका टास्कनंतर उर्फी एविक्शनसाठी नॉमिनेट झाली.

यंदाच्या बिग बॉस ओटीटीची थीम लाईन ‘स्टे कनेक्शन’ आहे. प्रीमियर एपिसोडमध्ये शोमध्ये सर्व स्पर्धकांचे घराशी कनेक्शन झाले होते. हे कनेक्शन बनवण्यासाठीचा निर्णय महिला स्पर्धकांना देण्यात आला होता.

जीशानने तोडलं कनेक्शन

उर्फीचा आधीपासूनचा दोस्त जीशान खानला कनेक्शन म्हणून निवडलं होतं. शोच्या तिसऱ्या बिग बॉसने पुरुष स्पर्धकांना आपले कनेक्शन बदलण्याची ऑफर दिली.

ही ऑफर जीशानने स्वीकारली. जीशानने उर्फीला सोडून दिव्या अग्रवालला आपले कनेक्शन बनवलं. तोपर्यंत दिव्या अग्रवाल एविक्शनसाठी नॉमिनेट झाली. परंतु, कनेक्शन बनल्यानंतर ती सुरक्षित झाली. उर्फी कनेक्शन तुटल्यानंतर नॉमिनेट झाली.

उर्फी जावेद
ufri javed

उर्फीला घराबाहेर काढणं अयोग्य

आता उर्फीचं कुठलेही कनेक्शन नाही. त्यामुळे तिला घराबाहेर जावं लागेल, असं बिग बॉसकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिला हा शो सोडावा लागला. पण, बिग बॉसच्या घरातील सर्व भावूक झाले.

शमिता शेट्टी, नेहा भसीन आणि अक्षरा सिंहने तिला प्रेमळ निरोप दिला. परंतु, तिने बिग बॉस ओटीटीतून बाहेर येणं चाहत्यांना रुचलं नाही. चाहते हा अन्याय असल्याचं म्हणत आहेत.

पाहा व्हिडिओ – सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ? | Actress Rukmini sutar Exclusive

Back to top button