गायक केके यांच्‍या मृत्‍यूच्‍या सीबीआय चौकशीसाठी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल | पुढारी

गायक केके यांच्‍या मृत्‍यूच्‍या सीबीआय चौकशीसाठी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके ( कृष्णकुमार कुन्नाथ ) यांच्‍या मृत्‍यूची सीबीआय चौकशी करण्‍यात यावी, अशी मागण करणारी याचिका आज कोलकाता उच्‍च न्‍यायालयात दाखल झाली. वकील रवीशंकर चटर्जी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

३१ मे रोजी कोलकाता येथे केके यांच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात परफॉर्म करत असताना केके यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. यानंतर त्‍यांचे हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने बॉलीवूडमध्‍ये खळबळ उडाली होती. केके यांच्‍या चेहर्‍यावर जखमा होत्‍या. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मृत्‍यूबाबत संशय व्‍यक्‍त करण्‍यात आला. अखेर शवविच्‍छेदन अहवालात त्‍यांच्‍या मृत्‍यू ह्‍दयविकाराने झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

केके यांच्‍या मृत्‍यूची सीबीआय चौकशी व्‍हावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्‍यास कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने वकील रवीशंकर चटर्जी यांना परवानगी दिली आहे.

 

 

Back to top button