संयोगितासाठी बरीच मेहनत घेतली : मानुषी | पुढारी

संयोगितासाठी बरीच मेहनत घेतली : मानुषी

माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर आता ‘सम—ाट पृथ्वीराज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. विशेष म्हणजे तिचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होत असतानाच तिने आपला दुसरा चित्रपटही पूर्ण केलेला आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की ‘सम—ाट पृथ्वीराज’मधील संयोगिताची भूमिका साकारण्यासाठी मी अतिशय मेहनत घेतली. रोज चार तास केवळ अभिनयाचेच प्रशिक्षण दिले जात होते. घोडेसवारी, तलवारबाजी आदींचेही प्रशिक्षण घेतले. तब्बल नऊ महिने असे प्रशिक्षण सुरू होते. या मेहनतीचे चीज होत असताना आता दिसत असल्याने आनंदी आहे! पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने काहीशी भीतीही आहे.

Back to top button