नोराचा चिमुरडीबरोबर डान्स! | पुढारी

नोराचा चिमुरडीबरोबर डान्स!

नोरा फतेही सध्या ‘आयफा अ‍ॅवॉर्डस्’साठी अबुधाबीत आहे. तेथील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती एका चिमुरड्या चाहतीसह नृत्य करीत असताना दिसून येते. ही चिमुरडी तिला इतकी आवडली की एखाद्या बाहुलीसारखी तिला उचलून तिने कडेवर घेतले. ‘मी या परीला घरी घेऊन जात आहे, बाय…आम्ही मुंबईला परत जात आहोत’ असे तिने सांगितले. त्यावेळी तिचा एक टीम मेंबर गंमतीने तिला म्हणाला, नोरा, तू हिला तुझ्याजवळ ठेवू शकत नाहीस’! नोरा सध्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात तिच्यासह अनेक तारका सहभागी झाल्या आहेत.

Back to top button