आता कधी पापा बनणार; दीपिकालाच विचारा ‘या’ प्रश्‍नाचे उत्तर! | पुढारी

आता कधी पापा बनणार; दीपिकालाच विचारा ‘या’ प्रश्‍नाचे उत्तर!

मुंबई

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या विवाहाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. खरे तर त्यांच्या डेटिंगला 2012 पासून सुरुवात झाली होती. ‘जयेशभाई जोरदार’ फेम रणवीर सिंगला चाहत्यांकडून सातत्याने आता कधी पापा बनणार, असा प्रश्‍न विचारला जातो. काही दिवसांपूर्वी या प्रश्‍नासंदर्भात दिग्दर्शक रोहित शेट्टीसमोरच रणवीरने मनमोकळेपणाने उत्तर दिले.

रणवीर सिंगने सांगितले की, आमच्या विवाहाला जरी चार वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही सर्व काही नवे नवे असल्यासारखे वाटते. दरम्यान, बाप कधी बनणार, यावर मजेशीर उत्तर देताना रणवीरने सांगितले की, दीपिका नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली आहे. ती परत येताच तिच्याकडून या प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही मिळवू शकता.

Back to top button