priyanka chopra
मनोरंजन
प्रियांकाने साजरा केला मॅनेजरचा वाढदिवस
पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रियांका चोप्रा कोणत्याही सेलिब—ेशनमध्ये भारतीय 'कनेक्शन' जोडतच असते. अलीकडेच तिने लॉस एंजिल्समधील आपल्या घरात मॅनेजर अंजूला आचार्य हिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. प्रियांकाने या पार्टीला 'इंडियन टच' देत ढोल पथकही बोलावले होते. या पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियातही वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रियांका ढोलवादनावर भांगडा करीत असतानाही दिसून येते. पार्टीमधील अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ही अभिनेत्री आपल्या गर्ल गँगबरोबर दिसून येते. व्हिडीओत प्रियांकाबरोबर तिचा पती निक जोनासही दिसतो.

