राजेश्वरी खरात खुर्चीवर पाय टाकून म्हणते... | पुढारी

राजेश्वरी खरात खुर्चीवर पाय टाकून म्हणते...

कोल्हापूर पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या फँड्री चित्रपटातून राजेश्वरी खरात हिने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली. ‘फँड्री’ने अख्ख्या महाराष्ट्रासह जागतिक चित्रपट सृष्ट्री गाजवली.

या चित्रपटातील मुख्य पात्रे जब्या आणि शालू हे त्यांच्या रुपरी पडद्यावरील नावानेच ओळखली जाऊ लागली. राजेश्वरी उर्फ शालूने प्रेक्षकांना नेहमीच भूरळ घातली. लोक आजही तिच्यावर शालू म्हणूनच प्रेम करतात.

राजेश्वरी म्हणजेच शालू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. स्वत:चे वैविध्यपूर्ण फोटो, व्हिडिओ शेअर करून ती नेहमीच आपल्या चाहत्यांचे मन जिंकते.

फँड्री चित्रपटात साधीभोळी आणि दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात आपल्या वैयक्तीक आयुष्यात फारच बोल्ड आणि हॉट आहे. तिचे अनेक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळतात.

सध्या तिचा एक सलमान खानच्या गाण्यावरील व्हिडिओ गाजत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. त्याचबरोबर ती या व्हिडिओ वरून ट्रोलही होत आहे.

चोरी चोरी सपनोमें आता है कोई… सारी सारी रात जगाता है कोई… हे सलमान खानच्या चल मेरे भाई या चित्रपटातले आहे. याच गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा धुमाकूळ उडवून दिला आहे. काही चाहते तिला तुझ्या स्वप्नात कोण येत आहे? त्याचं नाव जाहीर कर, अशी विचारणा करताना दिसत आहेत. तर काही चाहते ट्रोल करताना म्हणत आहेत की, शालू तुझ्या डान्समुळे सिंगल पोरांच्या किडनीला हार्टअटॅक येईल….

करीश्मा कपूर आणि सलमान खान यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट २००० ला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी सलमान-करीश्मा जोडीला चांगलीच पसंती दिली. आता तब्बल ११ वर्षांनी राजेश्वरी खरात हिला चोरी सपनो में आता है कोई… या गाण्याने नाचण्यास भाग पाडले आहे.

रेड लाईट… राजेश्वरीचा अगामी चित्रपट…

फँड्री नंतर राजेश्वरी खरात अत्यंत वेगळा आणि वास्तवदर्शी विषय घेऊन एका अनोख्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

राजेश्वरी आता आधीपेक्षा अत्यंत वेगळी, धाडसी आणि बऱ्यापैकी बोल्ड झाली आहे. ‘फँड्री’ नंतर आता आगामी काळात राजेश्वरी ‘रेड लाईट’ एक विदारक सत्य या चित्रपटात झळकणार आहे.

ही बातमी स्वतः राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती.

नुकतेच तिने तिच्या आगामी चित्रपटाचे अनोखे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये ती बेडवर बसलेली दिसत आहे. सोबतच तिने लाल रंगाची साडी परिधान केली असून केसांची वेणी घातली आहे. अशा लूकमध्ये ती अत्यंत आवेगे रागीट नजरेने भेदक मारा करताना दिसते आहे.

हे पोस्टर शेअर करताना राजेश्वरीने लिहिले कि, “सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्रीची तुला!”.

हे पोस्टर आणि कॅप्शन पाहून तुमच्याही लक्षात येईल कि, हा एका वैश्या असणाऱ्या स्त्रीवर आधारित चित्रपट असणार आहे. ‘रेड लाईट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती निलेश नगरकर यांनी केली आहे.

‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी भोळी शालू साकारणारी राजेश्वरी अचानक एका आगळ्या वेगळ्या कथानकासोबत प्रेक्षकांसमोर नवीन भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ?

https://www.youtube.com/watch?v=SJZt0DdkXf0&t=46s

Back to top button