सलमानचं मेहुण्यासोबत बिनसलं?, आगामी चित्रपटातून आयुषची एक्झिट

Aayush Sharma quits Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali
Aayush Sharma quits Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali

पुढारी ऑनलाईन : 
बॉलिवूड स्टार सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्‍याचा मेहुणा ( बहिण अर्पिताचा पती ) आयुष शर्मादेखील महत्त्वाची भूमिका साकारणार होता; पण सध्या सुरू असलेल्या चर्चेतून आयुष शर्मा या चित्रपटात काम करणार नसल्याचे समजते, त्याला कारण देखील तसेच आहे.

यापूर्वी सलमान आणि आयुषची जोडी अंतिम ' द फायनल ट्रुथ ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होती. लवकरच हे दोघे सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' यामध्ये एकाच पडद्यावर दिसणार होते. दरम्यान आता आयुष शर्मा आणि सलमान खान फिल्म्स यांच्यात काही मुद्द्यांवरून वाद झाल्यानं आयुष शर्माने 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातून  एक्झिट करण्याचा  निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

या चित्रपटातून फक्त आयुषच नाही तर, जहीर इकबालने देखील एक्झिट केली आहे. आता या चित्रपटाचे निर्माते दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घेत आहेत. निर्माते अभिनेत्री भाग्यश्री दसानी आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी यांना 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता वेंकटेश दग्गुबाती आणि पूजा हेगडे यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर ला प्रदर्शित होणार असून सध्या याचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू आहे. याशिवाय सलमान खान टायगर 3, पठाण, गॉड फादर या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news