urmila jagtap
urmila jagtap

Urmila Jagtap : उर्मिला झळकणार श्यामची आई चित्रपटात

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री उर्मिला जगताप (Urmila Jagtap) करिअरच्या सुरुवातीच्या काळातच विविध भूमिकांनी लक्ष वेधून घेत आहे. उर्मिलाचा रौद्र हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज झाला. रौद्र चित्रपटातील उर्मिलाच्या (Urmila Jagtap) कामाचं कौतुक झाले. रौद्र चित्रपटानंतर उर्मिला आता नक्की काय करते आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना असेल. उर्मिलाचा नवीन चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. उर्मिलाने नुकतंच नव्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे श्यामची आई. हा चित्रपट सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटाबद्दल उर्मिला सांगते ''एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकेल. १ एप्रिलला माझा रौद्र चित्रपट रिलीज झाला. ३ एप्रिलला लगेच श्यामची आई या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. नावाजलेले प्रोजेक्ट, नवीन टीम, नावाजलेले कलाकार, त्यातही पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुजय डहाके, त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण होतं. पण, प्रत्यक्षात सेटवरचा अनुभव मला खूप शिकण्यासारखा होता.''

साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या मूळ कथेवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल उर्मिला पुढे सांगते, "या चित्रपटाचा काळ वीस – तीसच्या दशकातील असल्याने त्या काळची भाषा, देहबोली या सगळया गोष्टी मला शिकायला मिळाल्या. या भूमिकेसाठी मी जीव ओतला असं म्हणेन. सुजय सरांनी मला खूप मदत केली. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा कोणती भूमिका आहे ? टीम कोणती आहे ? हेही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे."

श्यामची आई चित्रपटातील उर्मिलाच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news