भारती सिंगला दाढी-मिशीवर विनोद करणं पडलं भारी, हात जोडून मागितली माफी (Video) | पुढारी

भारती सिंगला दाढी-मिशीवर विनोद करणं पडलं भारी, हात जोडून मागितली माफी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाढी-मिशीवरील विनोद करणं कॉमेडियन भारती सिंगला महागात पडलं आहे. दाढी-मिशीवरील विनोदामुळे ती अडचणीत आली आहे. त्यामुऴे शीख समुदाय तिच्यावर नाराज असून, तिच्या वक्तव्याचा निषेधही व्यक्त केला जात आहे. या विरोधानंतर भारतीने हात जोडून माफीदेखील मागितली आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचा या विनोदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ट्रोलिंगनंतर भारतीने यावर स्पष्टीकरण दिलं. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असं तिनं म्हटलं.

काय आहे प्रकरण?

भारतीच्या कॉमेडी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन गेस्ट म्हणून आली होती. यावेळी भारतीने विनोद करत दाढी-मिशी का नको यावर संगितले की, दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाकली तर शेवयाची चव येते. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, ज्यांचं नुकतेच लग्न झाले आहे. त्या सर्वजणी दिवसभर दाढी आणि मिशीतून उवा काढण्यात बिझी असतात. या विनोदानंतर मात्र चांगलाच वाद निर्माण झाला. तिला ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागले.

हात जोडून मागितली माफी..

भारतीच्या विनोदाने शिख समुदायाच्या भावना दुखवल्याचे म्हटले जात आहे. भारतीच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला जात आहे. अखेर भारतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत आपल्या वक्तव्याबद्दल तिने माफी मागितली आहे.

भारती काय म्हणाली?

तिच्या या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला. यावर ती म्हणाली, हा व्हिडीओ मी अनेकदा पहिलाय. तुम्हीदेखील तो व्हिडीओ बघा. यामध्‍ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. मी कधीही कोणत्या धर्म किंवा जातीबद्दल बोललेले नाही. हा विनोद ही माझ्या मैत्रिणीसोबत केला होता. मी सहजपणे बोलून गेले होते. माझ्या या विनोदामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरमध्ये झाला. मी पंजाबी आहे, याचा मला अभिमान आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

Back to top button