श्रीदेवीच्या दुसऱ्या लेकीचा नजराणा पाहून सोनम कपूरलाही कमेंटचा मोह आवरला नाही! (photos) | पुढारी

श्रीदेवीच्या दुसऱ्या लेकीचा नजराणा पाहून सोनम कपूरलाही कमेंटचा मोह आवरला नाही! (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडस्ट्रीत अशी काही किड्स स्टार्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये डेब्यू केलेला नाही, परंतु त्यांची लोकप्रियता मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. नुकतीच श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. 

अधिक वाचा : महसूलाची ‘ओढ’ लागलेल्या विजय वडेट्टीवारांना बाळासाहेब थोरातांकडून सबुरीचा सल्ला! 

खुशी रेड वनपीसमध्ये एका परीपेक्षा कमी दिसत नाही. या फोटोजमध्ये खुशी कपूरचा ग्लॅमरस लूक दिसत असताना तिची बहीण सोनम कपूरनेही या फोटोंवर भाष्य केले. इतकेच नाही तर बॉलिवूडच्या इतर अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोंवर आपले मत दिले आहे.

अधिक वाचा : ‘ही’ हॉट दाक्षिणात्य अभिनेत्री कोण, जी शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये येतेय! 

खुशी कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या वनपीसमध्ये दिसून येते. कुरळे केस आणि न्यूड मेकअप तिचा लुक परिपूर्ण बनवत आहे. तिच्या प्रत्येक फोटोत ती कौतुकास पात्र आहे. चाहत्यांसह खुशीच्या पोस्टवर सेलेब्सकडूनही कमेंट्सचा ओघही आला आहे.

अधिक वाचा : चहलचा बायकोसोबत भन्नाट डान्स! (video)

संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने फायर इमोजी करून कमेंट केले आहे. नव्यानंदाने हार्ट बनवून खुशीचे कौतुक केले आहे, सोनम कपूरने  भाष्य केले आणि म्हटले आहे की ‘मला हे खूप आवडले’ या खेरीज महिप कपूर आणि अंशुला कपूरसुद्धा आनंदी आहेत. या फोटोवर आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

Back to top button