झुंड चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा | पुढारी

झुंड चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट ओव्हर दी टॉप अर्थात ओटीटीवर प्रदर्शित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे.

कॉपीराईट नियमांचे उल्‍लंघन केल्याचा आरोप झुंडच्या निर्मात्यांवर झाला होता. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने निर्मात्यांना झुंडच्या डिजिटल रिलीजला मनाई केली होती. यावर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झुंड चित्रपट ६ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट याआधीच ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. गैरसरकारी संघटना स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

Back to top button