patiala on high alert : पटियालामध्‍ये हाय अलर्ट, इंटरनेट सेवा बंद

patiala on high alert : पटियालामध्‍ये हाय अलर्ट, इंटरनेट सेवा बंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर राज्‍यातील पोलिस दल ॲक्‍शन मोडमध्‍ये आले आहे. शहरात सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्‍यात आली आहे. तसेच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. दरम्‍यान, आज काही हिंदुत्त्‍ववादी संघटनांनी हिंसाचाराच्‍या निषेध करत शहर बंदचे आवाह्‍न केले आहे.पोलिस महानिरीक्षक राकेश अग्रवाल यांची बदली केली आहे. त्‍यांच्‍या जागी मुखविंदसिंग छिन्‍ना यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

शीख फॉर जस्‍टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पुन्नूने शुक्रवारी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेनेविरोधात पटियाला येथे खलिस्तानी मुर्दाबाद मार्च काढण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी दुपारी शिवसेनेने मोर्चा काढला, तर दुसरीकडे खलिस्तान समर्थकांनी त्याला विरोध केला. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि खलिस्‍तानी समर्थकांमध्‍ये तुफान हाणामारी झाली. दगड आणि तलवारीच्‍या वापरामुळे परिसरात प्रचंड तणाव वाढला. सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत हा धिंगाणा सुरु होता. हिंसाचारात एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता.

पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच शहरातील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ केली आहे. शहरात सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्‍यात आली आहे. तसेच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. दरम्‍यान, पंजाब शिवसेनेचे माजी कार्याध्‍यक्ष हरिश सिंघल याला अटक करण्‍यात आली असून, पक्षातूनही त्‍याची हकालपट्‍टी करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news