Samantha Ruth Prabhu : चाहत्यांनी साजरा केला समांथाचा वाढदिवस | पुढारी

Samantha Ruth Prabhu : चाहत्यांनी साजरा केला समांथाचा वाढदिवस

पुढारी ऑनलाईन : समांथा रूथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) ही कोण आहे हे माहिती आहे का? आपल्याकडे अनेकांनी हे नावही ऐकलेले नसले तरी दक्षिणेत हे नाव घराघरांत पोहोचलेले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची ही अनभिषिक्‍त सम्राज्ञीच आहे. सर्वाधिक मानधन घेणार्‍या समांथाने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘पुष्पा’मधील आयटम साँगमुळे आता ती हिंदी पट्ट्यातही अनेकांच्या ओळखीची झाली आहे. गुरुवारी तिचा वाढदिवस होता आणि तिच्या असंख्य चाहत्यांनी तो दणक्यात साजरा केला.

एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या समांथाने ‘ये माया चेसवे’ या 2010 मधील चित्रपटाने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि तिला कधी मागे वळून पाहावे लागले नाही. ‘थेरी’, ‘अ आ’, ‘अंजान’, ‘मक्खी’ असे अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. ‘द फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजमधील तिची ‘राजी’ अनेकांना आवडली.

2017 मध्ये तिने सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य याच्यासमवेत विवाह केला; पण हे नाते फार काळ टिकले नाही. समांथा तिच्या लक्झरियस लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असते. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स येथे तिचा आलिशान बंगला आहे. अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button