Payal Rohatgi : पायलनं आई न होण्याचा केला खुलासा, बॉयफ्रेंड म्हणाला….

Payal Rohatgi : पायलनं आई न होण्याचा केला खुलासा, बॉयफ्रेंड म्हणाला….

पुढारी ऑनलाईन ; बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या 'लॉक अप' (Lock Upp) हा शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील दुःखद प्रंसग शेअर करत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi ) तिच्या आयुष्यातील गुपित गोष्टीचा खूलासा केली आहे. यात तिने आई होत नसल्याचा खुलासा केला आहे. तर यावर पायलचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'लॉक अप' (Lock Upp) या शोमध्ये 'सेलिब्रिटी इन जेल' या खेळात सर्वाची स्पर्धा सुरू आहे. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहभागी झालेल्या स्टार्संना त्याच्या आयुष्यातील अनेक गुपित गोष्टीचा खुलासा करावा लागत आहे. याच दरम्यान पायल रोहतगीने आपल्या आयुष्यातील सर्वात दुःखद रहस्य कॅमेरासमोर उघड केले. यात तिने स्वत: ला मुलं होत नसून आपण कधीच आई बनणार नसल्याचा खुलासा केला आहे. यावेळी पायलला अश्रू अनावर झाले होते.

पायलने (Payal Rohatgi ) यावेळी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आई बनण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु, प्रत्येक वेळी आम्ही अपयशी ठरलो. हे सांगताना मला खूपच दु:ख आणि वाईट वाटत आहे. मला आणि बॉयफ्रेंड संग्राम सिंहला मुलं खूपच आवडतात. आम्ही लग्न देखील करणार होतो. परंतु, याच दरम्यान मी आई होऊ शकत नसल्याचे समजले. यासाठी मी आयव्हीएफ ( IVF) देखील करून घेतले, परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे तिने सांगितले आहे.

तर संग्रामला मी दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, त्याने यासाठी स्पष्ट नकार दिला. असेही तिने म्हटले आहे. याशिवाय तिने प्रत्येक महिलेने वयाच्या २० व्या वर्षी 'एग्ग्स फ्रीज' करण्याची प्रक्रिया करून घेतली पाहिजे, कारण वयाच्या ३० व्या वर्षात आई होण्यास केणताही अडथळा येणार नाही, असा सल्ला दिला.

याच दरम्यान पायलचा बॉयफ्रेंड आणि कॉमनवेल्थ चॅम्पियन हेवी वेट कुस्तीपटू संग्राम सिंहने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'पायल आणि मी गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ती खूप मजबूत स्त्री आणि मुलगी आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. जीवनातील चढ-उतारात आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे आणि यापुढेही देत ​​राहू. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आहे. परिस्थिती कशीही असो, मी त्याला सदैव साथ देईन. ती आई होऊ शकत नसली तर काय झालं. याचा अर्थ असा होत नाही की, मी दुसरे लग्न करावे. हे कधीच होऊ शकत नाही. मला तिच्यात काहीच कमतरता जाणवत नाही. माझ्यासाठी ती एक परिपूर्ण जीवनसाथी आहे.'

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह २०११ पासून एकमेंकाना डेट करत आहेत. त्यानी अद्याप लग्न केलेले नाही. पायल आणि संग्राम एका रियालिटी शो Survivor India च्या सेटवर पहिल्यादा भेटले होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news