Vijay Babu : विजय बाबूवर लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल, फेसबुक लाईव्हनं केला खुलासा | पुढारी

Vijay Babu : विजय बाबूवर लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल, फेसबुक लाईव्हनं केला खुलासा

पुढारी ऑनलाईन : मल्ल्याळम अभिनेता आणि चित्रपट निर्माता विजय बाबूवर (Vijay Babu) लैगिंक अत्याचाराचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला आहे. एका महिलेला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवत त्यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच दरम्यान विजय बाबूने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोझिकोड (Kozhikode) येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने विजय बाबूच्या (Vijay Babu) विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने विजय बाबूने चित्रपटामध्ये काम देण्याच्या आमिषाने बोलावून घेत कोची येथील एका फ्लॅटमध्ये लैगिंक अत्याचाराचा केल्याचे म्हटले आहे. महिनेने ही तक्रार गेल्या शुक्रवारी ( दि. २२ एप्रिल) रोजी पोलिसांत दाखल केली होती. तक्रार देवून पाच दिवस उलटले असून अद्याप विजय बाबूची कोणतीही चौकशी केली नसल्याचे त्या महिलेने सांगितले आहे.

याच दरम्यान विजय बाबूने फेसबुक लाईव्ह करत महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच तिला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. चुकीचे आरोप लावल्याने येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा असेही त्यांनी म्हटले आहे.

मला बळीचा बकरा बनवला जात आहे. माझी बदनामी झाली आहे. याबाबतचे सर्व पुरावे मला द्यावे, बदनामी झाल्याने मी केस दाखल करणार आहे. मला कोणाचाही कुटुंबाला इजा पोहोचवायची नसल्याने गप्प बसलो आहे, तसेच २०१८ मध्ये मी तिला पहिल्यांदा भेटले होतो. २०१८ ते २०२१ या कालावधीत तिच्याशी संवाद साधण्यास नकार दिला होता. याच दरम्यानचे स्क्रीनशॉट्स असल्याचा दावाही त्यांनी केला.

विजय बाबूने मल्ल्याळम भाषेतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. फ्रायडे (Friday Film House) फिल्म नावाचे प्रोडक्शन हाऊस विजय यांचे आहे. या प्रोडक्शन हाऊसचा महेश बाबू हा संस्थापक आहे. काही दिवसांपूर्वी या प्रोडक्शन हाऊसच्या नव्या चित्रपटाची घोषणादेखील केली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button