जान्हवीचे नवे फोटोशूट | पुढारी

जान्हवीचे नवे फोटोशूट

‘धडक’ या पहिल्या चित्रपटात जान्हवीने आपल्या अभिनयाची फारशी चमक दाखवलेली नव्हती. श्रीदेवीचे सौंदर्य, चार्म किंवा अभिनयक्षमता तिच्यामध्ये आहे असे काही त्यामध्ये दिसून आले नव्हते. मात्र, ती एक उत्कृष्ट डान्सर आहे हे नंतरच्या काळात तिचे काही व्हिडीओ पाहून दिसून आले.

हल्‍ली जान्हवी तिचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर करीत असते. त्यामधून तिचे खुललेले सौंदर्य दिसून येते. आताही एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमधून तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मासिकासाठी तिने अक्षरशः ‘किलर फोटोशूट’ केला आहे. त्यामधील तिचे पोशाख आणि पोजही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘कव्हर गर्ल’ बनलेल्या 25 वर्षांच्या जान्हवीने आता एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून स्वतःमध्ये केलेले बदल यामधून दिसून येतात.

Back to top button