Sidharth Kiara Breakup: कियारा आणि सिद्धार्थचा ब्रेकअप? | पुढारी

Sidharth Kiara Breakup: कियारा आणि सिद्धार्थचा ब्रेकअप?

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर सर्वांचं लक्ष अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्याकडे लागून राहिले होते. परंतु, याच दरम्यान चाहत्यांना धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. सिद्धार्थ आणि कियारा आडवाणी यांचा ब्रेकअप ( Sidharth Kiara Breakup ) झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी ‘शेरशाह’ चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना पसंतीस उतरली होती. यानंतर दोघांच्यात मैत्री होवून प्रेम झाले. दोघांना अनेकदा डिनर डेटवर एकत्रित पाहिले गेले. यामुळे चाहत्यांनी सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्न बंधनात अडकतील असे वाटत होते. परंतु, सध्या चाहत्यांना धक्का देणारे वृत्त समोर येत दोघांचा ब्रेकअप ( Sidharth Kiara Breakup ) झाल्याचे समजले आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, ‘शेरशाह’ फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी ही जोडी विभक्त झाली आहे. दोघांनी भेटणं देखील बंद केले आहे. दोघांनी आपआपले मार्ग निवडले असून आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. परंतु, दोघांनी या वृत्तावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे दोघांच्या ब्रेकअपचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हे वृत्त चाहत्यांना समजताच त्यांनी दोघांच्यातील गैरसमज लवकरच दूर होवून सर्वकाही ठिक व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘मिशन मजनू’, ‘योद्धा’ आणि ‘थॅक गॉड’ चित्रपटात दिसणार आहे. तर कियारा आडवाणी आगामी ‘भूल भुलैया २’, ‘गोविंदा मेरा नाम’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘आरसी १५’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Back to top button