रश्मिका मंदाना रणबीरसोबत! | पुढारी

रश्मिका मंदाना रणबीरसोबत!

पुढारी ऑनलाईन : ‘पुष्पा’ची ‘श्रीवल्‍ली’ रश्मिका मंदाना सध्या हिंदीतही चांगलीच बिझी झाली आहे. आता ती रणबीर कपूरसमवेत ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली असून या चित्रपटाचे आता शूटिंगही सुरू झाले आहे.

रश्मिका मंदाना सध्या अनेक प्रोजेक्टस्मध्ये व्यग्र आहे. ‘मिशन मजनू’ या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट 10 जूनला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासमवेतच्या ‘मिशन मजनू’ नंतर ती अमिताभ बच्चन स्टारर व विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ या चित्रपटातही दिसेल. दक्षिणेत ती सुपरस्टार थलपती विजयसमवेत ‘थलपती 66’ या चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button