

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शाहरुख खानने (DUNKI) आपल्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. त्याने 'पठाण' नंतर त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तसेच हा प्रोजेक्ट शाहरुख खानसाठी (shahrukh khan) तर महत्त्वाचा आहे. पण, तो त्याच्या चाहत्यांसह अन्य प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, प्रेक्षक ज्या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात त्या दिग्दर्शकासोबत शाहरुख नवा चित्रपट करणार आहे. अर्थातच तो दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिराणी (rajkumar hirani). अखेर शाहरुखला राजकुमार हिराणी यांचा (DUNKI) चित्रपट मिळाला आहे. त्यामुळे राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान ही जोडी मोठ्या पडद्यावर काय धमाल करणार यासाठी सारेच उत्सुक असणार आहेत.
राजकुमार हिराणी (DUNKI) आणि शाहरुख खान यांचा एक व्हिडिओ मंगळवारी रिलीज झाला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान हा राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटांचे पोस्टर बघत आहे. त्यावेळी राजकुमार हिराणी तेथे येतो आणि म्हणतो काय पाहतोस. शाहरुख म्हणतो, रणबीर कपूर 'संजू' मध्ये, आमिर खान 'पीके' मध्ये आणि संजय दत्तकडे तर मुन्नाभाई आहे. तुमच्याकडे माझ्यासाठी काही आहे का? यावर राजकुमार हिराणी म्हणतो आहे ना. पुन्हा शाहरुख त्याला विचारतो कॉमेडी, इमोशन्स आहे. राजकुमार म्हणतो आहे. पुन्हा शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये दोन्ही हात थोडे वर घेत म्हणतो रोमॅन्स आहे. राजकुमार हिराणी म्हणतो आहे ना पण, त्यात तुझी स्टाईल थोडी कमी ठेवावी लागेल. या सर्वांवर शाहरुख खूश होतो आणि चित्रपटाच्या नावा विषयी विचारतो. राजकुमार हिराणी चित्रपटाचे नाव 'डंकी'(DUNKI) आहे असं सांगतो. शाहरुख आश्चर्याने म्हणतो डॉन्की (donkey). राजकुमार हिराणी पुन्हा म्हणतो नाही, 'डंकी' आणि तेथुन राजकुमार हिराणी जातो. शाहरुख म्हणतो माहित नाही काय बनवणार आहे पण मला यात घेऊ दे रे बाबा.
या व्हिडिओवर (DUNKI) सध्या शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांच्या चाहत्यांचे अनेक कमेंट पडलेले आहे. सर्वांनीच या व्हिडिओचे जोरदार स्वागत केले आहे अणि सर्वांनाच या नव्या चित्रपटाची उत्सुकता या व्हिडिओमुळे लागून राहिली आहे. अद्याप नेमका हा चित्रपट कशावर आधारित आहे, त्यात काय असणार या बद्दल कोणतीच कल्पना देण्यात आली नाही. पण, राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान आहेत म्हटल्यावर प्रेक्षकांची निराशा होणार नाही हे मात्र नक्की. या चित्रपटात शाहरुख सोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखिल दिसणार आहे.
अर्थात (DUNKI) या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करणार आहे. तर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. तसेच राजकुमार हिराणी आणि गौरी खान या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या एप्रिलपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रिकरण हे पंजाबमध्ये केले जाणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला पुढील वर्षात म्हणजे २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुन्नाभाईसाठी पहिली पसंद होता शाहरुख खान
शाहरुख खान हा राजकुमार हिरानी यांचा नेहमी आवडता कलाकार राहिला आहे. मुन्नाभाई एमबीबीएस वेळी राजकुमार हिराणी यांची पहिली पसंद शाहरुख खान हा होता. त्यावेळी शाहरुख खान यांना घेऊन चित्रपटासाठी फोटो सेशन सुद्धा झाले होते. पण, पुढे शाहरुख या चित्रपटाचा भाग होऊ शकला नाही आणि हा चित्रपट संजय दत्त याला मिळाला.
मुन्नाभाई मुळे संजय दत्त याचे संपत चाललेल्या करिअरला पुन्हा उभारी मिळाली. एक प्रकारे त्याचे या चित्रपटाद्वारे पुनरागमनच झाले. मुन्नाभाईच्या यशानंतर या चित्रपटाचा भाग नसल्याने शाहरुखला दु:ख देखिल झाले. पण, पुढील राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटात अमिर खान, रणबीर कपूरला संधी मिळाली. अखेर इतक्या वर्षांनी शाहरुख खानला राजकुमार हिराणी यांचा चित्रपट मिळाला आहे.