Rajeshwari Kharat : रुसलीस का शालू 🙄, राजेश्वरीला लागले लग्नाचे वेध | पुढारी

Rajeshwari Kharat : रुसलीस का शालू 🙄, राजेश्वरीला लागले लग्नाचे वेध

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे तब्बल पाच वर्षांच्‍या रिलेशनशीपनंतर अखेर लग्‍न बेडीत अडकले. यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिला देखील आपल्या लग्नाचे वेध लागले आहेत. असाच एक राजेश्वरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

फॅन्ड्री चित्रपटातील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने ( Rajeshwari Kharat ) नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एका गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली. यात तिने देव नेगी, सीपी झा, जसपिंदर नरुला यांच्या ‘सबकी बाराते आई, डोली तू भी लाना, दुल्हन बना के हमको, राजाजी तू ले जाना…’ या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. हा व्हिडिओ एका रूममध्ये बनविलेला असून राजेश्वरीच्या पाठिमागे मोठा एलएडी टीव्ही पाहायला मिळत आहे.

यावेळी तिच्या मोकळ्या केसांनी आणि मेकअपने सौदर्यांत आणखी भर घातली आहे. या व्हिडिओत राजेश्वरीच्या चेहऱ्यावर प्रेमाची झलक पाहायला मिळाली. यावरून राजेश्वरी लग्नासाठी आतुरतेने आपल्या भावी पतीचा वाट पाहात असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘किती सुंदर असावं एखाद्याने’, ‘काळी चिमणी पाह्यजे लगा …😍😍’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘रुसलीस का शालू 🙄’ असे म्हटले आहे. तर आणखी काही नेटकऱ्यांनी ‘लालपरी🤩🥳🥳🥳’, ‘सुंदर डान्स’, ‘क्यूट’ यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यासिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फोयरचे ईमोजी शेअर केले आहेत.

फॅन्ड्री चित्रपटात साधी दिसणारी राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस हॉट दिसत आहे. तिच्या इंन्स्टाग्रामवर दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. याआधी तिने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोफ्यावर बसलेले फोटोशूट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button