Nysa devgan
Nysa devgan

Nysa devgan : न्यासाचे पदार्पण कधी?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी कन्या न्यासा देवगण सध्या स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र, तिच्या बॉलीवूड पदार्पणाबाबतही नेहमी चर्चा होत असते. नुकतेच अजय देवगणला याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने न्यासाच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्याने सांगितले, तिला या क्षेत्रात यायचं आहे की नाही, हेच मला माहिती नाही. अद्याप तिने या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची रूची दाखवलेली नाही; पण मुलांबाबत अनेक गोष्टी अचानक बदलतात. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते. सध्या ती परदेशात असून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करीत आहे.

न्यासा सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लिऑन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. त्याआधी तिने सिंगापूरमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. न्यासाचा जन्म 2003 मध्ये झाला असून अजय व काजोलला तिच्याशिवाय युग नावाचा एक मुलगाही आहे. अजय देवगण लवकरच 'रन वे 34' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news