Nora Fatehi : 'दिलबर गर्ल' नोरा फतेहीच्या दिलकश अदा | पुढारी

Nora Fatehi : 'दिलबर गर्ल' नोरा फतेहीच्या दिलकश अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुडची ‘दिलबर गर्ल’ म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेहीने फ्रॉकमध्ये आपल्या दिलकश अदा दाखवल्या आहेत. नोरा फतेही आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांच्या पसंतीस उतरत असते.  (Nora Fatehi)

अल्पावधीत डान्सिंग क्विन  अशी ओळख निर्माण केलेल्य नोराने प्रेक्षकांवर आपली  छाप पाडली आहे. नूकतंच तिने फ्रॉकमध्ये ग्लॅमरस फोटोशुट केले आहे. तिने काही फोटोज आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कॉमेंट केल्या आहेत.

तिच्या एका चाहत्याने कॉमेंट केली आहे की,  ब्युटीफुल डॉल, स्टनिंग.तिने या फोटोमध्ये चार चॉंद लावले आहेत. नोराने आपल्या डान्सने चाहत्यांच्यावर छाप पाडली आहे. नोराने अनेक रियलिटी शोची जज म्हणून भूमिका निभावली आहे. सध्या ती  रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ज्युनिअर’ची जज आहे.

नोराचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन वर्ग आहे. ती नेहमी आपले फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या डान्सने आणि सौंदर्याने अनेकांची धडकन बनलेल्या नोरा फतेहीचा हा दिलकश अंदाज तुम्हालाही आवडेल असा आहे. नोराच्या कुसू-कुसू या गाण्यासारखचं तिच्या दिलबर, ओ साकी साकी या गाण्यांनी धूमाकूळ घातला होता. नोराने दिग्दर्शक कमल सदाना यांच्या रोर : टायगर्स ऑफ द सुंदग या चित्रपटातून तिने बॉलिवूडमघध्ये पदार्पण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button