jay dudhane : देखण्या जय दुधाणेच्या बॉडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

jay dudhane
jay dudhane
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस मराठीचा फर्स्ट रनरअप जय दुधाणे (jay dudhane) याची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होतेय. दिसायला हँडसम असणारा जय दुधाणे (jay dudhane) याने त्याचे काही फोटोज शेअर केले आहेत. बॉडी फ्लॉन्ट करतानाचे त्याचे हे फोटो आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला ही कमेंट करायचा मोह आवरणार नाही. एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला या रियालिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. हॅण्डसम आणि उत्तम शरीरयष्टीमुळे जयने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या अभिनेत्याने बिग बॉस मराठी ३च्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवले होते. या घरात आल्यानंतर जयने स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

जयने इन्स्टावर एक फोटो शेअर केला असून CARVING ⚒? अशी कॅप्शन दिलीय. आपला फिटनेस दाखवत त्याने बॉडी फ्लॉन्ट केलीय. आणखी एका फोटोमध्ये त्याने खूप छान पोझ दिलीय. त्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. त्याचे चाहते त्याच्या फिटनेसचे कौतुक करताना दिसताहेत.

जय दूधाणे हा स्प्लिट्सविलाचा विजेता आहे. तो या सीझनचा फर्स्ट रनर अप होता. रोडीज या रिअॅलिटी शो मध्येदेखील तो सहभागी झाला होता. बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने याचं शोमधील स्पर्धक मीरा जगन्नाथ सोबत एक म्युझिक व्हिडिओदेखील केला.

"जोडी दोघांची दिसते चिकनी" असे या अल्बमचे नाव आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी "जोडी दोघांची दिसते चिकनी" या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना अमेय मुळे यांनी आवाज दिला आहे. जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी असे शब्द असलेलं हे गाणं जय आणि मीरा यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news