पिंपरी : आरटीई पालकांना मेसेजची प्रतीक्षा सलग दुसर्‍या दिवशीही कसलीच सूचना नाही | पुढारी

पिंपरी : आरटीई पालकांना मेसेजची प्रतीक्षा सलग दुसर्‍या दिवशीही कसलीच सूचना नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष सन 2022-23 करिता पिंपरी- चिंचवड महापालिक परिसरातील एकूण 168 शाळांची आरटीईसाठी निवड झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी या वर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.

प्रवेश प्रक्रियेची 31 मार्च रोजी सोडत झाली असून, 4 एप्रिलपासून दुपारी चार वाजता प्रत्येक लाभार्थ्याच्या त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज येऊ लागतील, असे सांगितले. मात्र, दुसर्‍या दिवसापर्यंत पालक मेसेजची वाट पाहत आहेत. पण, मेसेज आले नाहीत.

लोकं दारू का पितात?, ‘ब्‍लॅक हेडेड स्‍पायडर’वर होणार संशोधन

आरटीईच्या प्रवेशाविषयी कोणत्याही सूचना मिळत नसल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व कामे सोडून मेसेजकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकांना मदतीसाठी कोणतीही हेल्पलाईन नसल्यामुळे कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.पालकांनी मेसेज आल्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी पालिकेच्या दोन केंद्रावर जावून कागदपत्र पडताळणी करायची आहे.

चहलच्या पत्नीचे ‘क्रेझी सेलिब्रेशन’ पाहुन तुम्ही व्हाल अवाक! (Video)

पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील मनपा, शाळा पिंपरी (जुना ड प्रभाग) आणि आकुर्डी खंडोबा माळजवळ उन्नत केंद्र वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा याठिकाणी ही कागदपत्रे पडताळणी होणार आहे.

प्रवेशासाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे घेवून आरटीई कागदपत्रे पडताळणी समितीकडे जावून पडताळणी करुन प्रवेश पत्र घेवून नंतर शाळेकडे जाणे, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.मात्र, मेसेज न आल्याने पालकांना प्रवेशबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालक प्रवेशासाठी मेसेजच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी : मालक गावाकडं सोनं सापडलंय

“शासनाकडून 4 एप्रिल रोजी मेसेज येतील, असे सांगितले होते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळपासून आम्हाला 30 ते 40 पालकांचे फोन आले. अद्याप कोणालाही मेसेज आले नाहीत. आरटीई पोर्टल देखील बंद आहे.”

-शरण शिंगे, उपाध्यक्ष, आरटीई पालक संघ

Back to top button